रामबन आपत्ती प्रदेश जाहीर करा   

उमर अब्दुल्ला यांची केंद्राकडे मागणी; भरीव मदतीची अपेक्षा

रामबन : ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे बाधित झालेला रामबन जिल्हा आपत्ती प्रदेश जाहीर करावा, अशी मागणी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारकडे केली  आहे. बाधितांसाठीे भरीव मदत केंद्राने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
रामबन जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी ढगफुटीनंतर नैसर्गिक संकट कोसळले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी परिसराचा दौरा केला. तेथील कुटुंबाशी संवाद साधला.  ते म्हणाले, जम्मू श्रीनगर महामार्ग दरडी कोसळल्यामुळे मार्ग बंद झाला होता. तो पूर्ववत सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. २४ तासांत महामार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू होईल.
 
घरे कोसळून आणि वाहनांत अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यानंतर महामार्ग आणि रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत केली जात आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. रस्त्यांवर विविध ठिकाणी कोसळेलेल्या दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घरांचे फेरनिर्माण होईपर्यंत बाधितांची अन्यत्र सुरक्षित स्थळी व्यवस्था केली जाणार आहे उपायुक्त बासेर उल ह चौधरी यांनी रेडक्रॉस नियमा तअंर्तर्गत तातडीने 
कुटुंबांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दलाची पथक मदतकार्यात गुंतली आहेत. तसेच रामबनला आपत्ती प्रदेश केंद्र सरकारने जाहीर करावा, यासाठी आणि केंद्राकडून बाधित कुटुंबांना तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. केंद्र सरकार तशी मदत नक्की करेल, असा विश्वास अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. दरम्यान, रामबनमधील १२ गावांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून तिघांचा मृत्यू झाला आहे.  मुख्यमंत्री अब्बुल्ला यांच्यासोबत त्यांचे राजकीय सल्लागार नसीर अस्लम वणी देखील दौर्‍यात होते  दोघेही रामबन येथील चंद्रेकोटे येथे हेलिकॉप्टरने आले आणि नंतर दरड कोसळलेल्या ठिकाणी गेले. तेथे अनेक घरांचे नुकसानही झाले आहे. 
 
उपायुक्त चौधरी यांनी पदयात्रा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. अब्दुल्ला यांनी मोटारीचा ताफा अनेक ठिकाणी थांबवून नागरिकांशी चर्चा देखील केली. तुमची पडलेली घरे पुन्हा बांधून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. 

निवडून दिले, आता मदत करा

बाधित महिलेची आर्त विनवणी 

घरेदारे पडल्यामुळे आम्ही उघड्यावर पडलो आहोत. प्रशासनाने काहीच मदत केली नाही, असे एका महिलेने अब्दुल्ला यांना सांगितले. ती म्हणाली, आता आम्हाला कोणी वाली उरलेला नाही. आमच्या व्यथा तुमच्या शिवाय कोण ऐकणार ? आम्ही तुम्हाला आमचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे आता मदत करण्याची तुमची पहिली जबाबदारी आहे. या वेळी मदतीच्या अपेक्षेने आलेल्या नागरिकांनी आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा दिल्या. काही नागरिकांनी आरोप केला की प्रशासनाने अजूनही कोणतीही मदत केली नाही  बाधित क्षेत्रात पिण्याचे पाणी आणि वीज पुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. निदर्शने करणार्‍या नागरिकांना उद्देशून अब्दुल्ला म्हणाले, सलग तिसर्‍यांदा ज्येष्ठ मंत्री आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी या भागाचा दौरा केला आहे रविवारी उप मुख्यमंत्री आणि दोन आमदारांनी भेट दिली. सोमवारी मी श्रीनगर येथून रस्तेमार्गे स्वत: आलो आहे.  त्यानंतर काल पुन्हा दौरा करत आहे.  पुनर्वसनाचे काम तातडीने करण्याचे आश्वासन मी तुम्हाला देतो. या वेळी त्यांनी निदर्शने करणार्‍या भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. भाजपच्या नेत्यांनी पूरग्रस्त भागात राजकारण करण्याऐवजी ते दिल्लीत करावे. महामार्गाच्या निर्मितीवेळी पुलावर अडथळे काही जणांनी आणले होते. ही बाब अत्यंत वेदनादायक असल्याची टीका त्यांनी केली. महामार्ग अधिक भक्कम व्हावा, यासाठी मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.
 

Related Articles